Tuesday, November 1, 2022

Sita

एक योद्धा होती ती
ज्ञानी व शक्तिशाली होती ती
लोक कल्याण व प्रगती साठी
लढा देणारी मैथिली होती ती

स्वतःची हि ओळख मागे ठेऊन
एक नवे अस्तित्व स्वीकारले
जनकाच्या राजकुमारी पासून
रामाची पत्नी जेव्हा ती झाले

सर्वोत्तम स्त्री म्हणून तिचीही ओळख असती
सक्षम व कर्तृत्ववान होतीच ती
पण आनंदाने त्यागले त्या आपल्या अस्तित्वाला
जेव्हा सांगे पुरुषोत्तम रामाच्या चालले ती

रावणाच्या लंकेतही खचली नाही
आत्मबळ कमी होऊ दिले नाही
खंबीरपणे उभी राहिली ती
आत्मसन्मान गमावू दिला नाही

अशा या थोर नारीची
कशी विचित्र हि गाथा
जीवनाने दिली तिला
नुसतीच व्यथा

जनतेने केला तिरस्कार
पतीने दिला संशयाचा पुरस्कार
निष्ठेने घडवलेली विश्वासाची मूर्ती
झाली कशी निराकार

खांबिर्याने लढा देत
केली जिने पती सन्मानाची रक्षा
पावित्र्य सिद्द्ध करण्यासाठी
द्यावी लागली तिलाच अग्निपरीक्षा!

सदैव दुसऱ्यांसाठी झटली जी
केली होती का कुणीतरी अशी कल्पना
त्या त्यागाच्या मूर्थीचीच व्हावी
अशी कशी हि विडंबना?

असत्य कितीही असले बलवान
तरी सत्याला नको त्याचे भेव
जनतेच्या बालिश हट्टापायी झुकलास
रामा असा कसा रे तू देव?

अपमानाने कटू झालेला जीव
केव्हाच तिने त्यग्ला असता
पोटात वाढणाऱ्या जीवाचा विचार
जर मनि आला नासता

दोन जीवांचा गर्भ घेऊन
भटकले ती राना वनात
आयुष्याचे ओझे सोसवायला
मिळाला आश्रय वाल्मिकी आश्रमात

चिमुकल्या जुळ्यांच्या चेहऱ्यात
हरवलेले सुख थोडे झळकले
पण काळाच्या लाटेने
तेही क्रूरपणे हरपले

पती व पुत्रांमधले भेद न तिला बघवले
थकले, खचले, हरले व शेवटी
भू गर्भात ती सामावले

-smita

No comments :

Post a Comment