रिमझिम बरसती धारा
त्यात हा गार वारा
मजवर आणती शहारा
आज भिजले मी ...
पानांवरती थेंब ओथंबलेले
पक्षी सारे चिंब भिजलेले
तरी या मोसमात रमलेले
आज भिजले मी ...
आभाळ आलेय भरुनी
दिसे सूर्य कुठे न गगनी
सर्वत्र हिरवळ पसरुनि
आज भिजले मी ...
मन माझे उडे सरा सरा
जसा पाऊस पडे झरा झरा
बंद डोळे नी बाहू पसारून
आज भिजले मी ...
हिरवळ - ती स्मृती लहानपणीची
वारा - ओढिती चादर आठवणींची
त्या आठवणींच्या पावसात
आज भिजले मी ...
आज भिजले मी ...
Found this in my old stuff today. Well the diary is of 2003, so I must have written it some 14 years ago. Putting the same on blog so it remains for long enough like the memories...