Sunday, May 14, 2017

Aai

आठवते मला तुझे ते वरण भातात तूप कालवणे 
कुठेही न मिळणारी प्रेमाची ती चव छोट्याशा मला भरवणे 
आपल्या इवल्याशा विश्वात आपण किती मज्जा करायचे 
मला परत त्या लहानपणाच्या काळात जायचे

गहिवरून आणण्याऱ्या तू सांगितलेल्या कविता त्या बालकवींच्या 
छोट्या छोट्या गोष्टींतून पाठ शिकवलास आयुष्याचा 
त्या सगळ्या आठवणी मला हृदयात साठवून ठेवायचेय
माझ्या मुलांनाही त्या सर्व गोष्टी मग सांगायचेय 


नकळत केव्हां मी लहानाचे झाले मोठे 
तुझ्यासाठी कदाचित मी अजूनही होते छोटे 
लहानपणा एवढीच काळजी अजूनही तू घ्यायचे 
मला परत जाऊन थोडी का होईना तुला मदत करायचेय 

स्वतःच्या पायावर जेव्हा उभे मी झाले 
दाटलेल्या कंठाने दूर मला तू सोडायला आले 
आशीर्वाद देतांना चेहऱ्यावर मात्र नेहमी स्मित असायचे 
तुला घट्ट मिठी मारून मला पुन्हा एकदा रडायचेय 

आई काय असते हे खरे मला कळले जेव्हा झाले स्वतः मी आई 
तशाच भावना, तसेच वात्सल्य, आईसारखे खरंच दुसरे कुणी नाही 
देतच राहिली आयुष्यभर मला, आता मलाही तुला काही द्यायचेय 
आई मलाही तुझ्यासारखीच आई व्हायचेय 

Happy Mother's Day

My first poem was on my Aai
Written at the age of 13


No comments :

Post a Comment